गाईचा चिक ❤/chik आणि रेसिपी

*आजचा विषय खरवस * खरवस हे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचे आगळे वेगळे वैशिष्टय. जेव्हा गाय किंवा म्हैस वासराला जन्म देते तेव्हा सुरवातीचे काही दिवस त्या गायीला किंवा म्हशीला जे दुध येते ते खूप दाट असते याचे कारण त्यात विविध रोगांशी सामना करण्यासाठी आवश्यक असलेले काही घटक असतात जेणेकरून नुकत्याच जन्मलेल्या वासरास ते दुध पाजून त्याची आई त्यास एक प्रकारे निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करते. कोलोस्त्रोम (colostrum) नावाचा घटक या दुधात असतो ज्यामुळे त्या वासरास एक प्रकारे 'Active Immunity' मिळते ज्यामुळे त्याच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती अनेक पटीने वाढते. यालाच चिक म्हणतात. याच दाट दुधात(चिकात) सुयोग्य प्रमाणात साधे दुध घालून त्यात गुळ / साखर व वेलची, जायफळ सारखे पदार्थ घालून ते मिश्रण शिजवतात व ते थंड झाल्यावर त्याच्या घट्ट वड्या पडतात व यास "खरवस" असे म्हणतात. हल्ली अनेक ठिकाणी खरवस विकत मिळतो पण त्यातील बहुतांश हा "चायना ग्रास" या पदार्थाने बनवला जातो. प्रोटीन व कॅलरीयुक्त ‘खरवस’ हा पोष्टीक पदार्थ उष्...