ख्रिश्चन धर्मियांचा दोन्ही करार संक्षिप्त आणि इस्लाम

अब्राहमिक धर्मांचा इतिहास व उत्पत्ति यावर आधारीत जूना व नवा करार आहेत. अब्राहमीक धर्मांचे मूळ ज्या यहुदी धर्मात आहे, त्याची आरंभापासूनची (सृष्टीनिर्मीतीपासूनची) समग्र कथा जुन्या करारात येते. 

जिहोवा हा एकमात्र इश्वर; त्याने सहा दिवसांत राबून प्रकाश, पाणी, भूमि, पशू, पक्षी व मनुष्य निर्माण कसे केले हि पहिली कथा आहे. पहिला मानव आदम व पहिली स्त्री हव्वा अशी नावे, तद्नंतर केन व आबेल ही आदमाची मुले, त्यांचा वाढत गेलेला वंश, मग जगबुडी, यहुद्यांचे सर्व प्रेषित जसे की नोहा, अब्राहम, इस्राएल (याच्याच नावावरून देशाचे नाव पडले), इहसाक, व अंतिम प्रेषित मोझेस यांची चरित्रे जुन्या करारात वर्णित आहेत. त्याच बरोबर बदलत गेलेला काल वगैरेही यात आहेत. जुना करार हा नव्या करारापेक्षा खूप स्वारस्यपूर्ण आहे, अर्थात् त्यांची कल्पना!
       नवा करार हा ख्रिस्तचरित्र वर्णन करतो. ख्रिस्ताच्या ८-९ शिष्यांनी (मत्तय, मार्क, ल्युक, योहान इ.इ.) लिहीलेल्या ख्रिस्तचरित्रांचा यांत अन्तर्भाव आहे. यांत प्रत्येक प्रकरणात ख्रिस्ताच्या जन्मापासून सुळीकरणापर्यंतच्या कथा आहेत. प्रत्येक प्रकरणात हेच आहे. त्यामूळे वाचताना कंटाळा येतो.

ख्रिस्ती लोक जुन्या करारास सत्य मानतात,  ते ज्यूंच्या सर्व प्रेषितांना मानतात पण खरा मात्र जिजस मानतात. मुसलमानही याच शृंखलेतील. मुसलमान जुना करार, नवा करार, त्यातील प्रेषित वगैरे सर्व मानतात, पण श्रेष्ठ प्रेषित मात्र महामद...

जर काही माहिती द्यायची असेल तर स्वागत आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाळवी

Babasaheb Ambedkar on Savarkar

आयुर्वेद -विनाशातून विनाशाकडे की आयुषकडे!