Rich dad poor dad marathi

          
                            < नमस्कार >
          रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक जगातील सर्वात जास्त विकले गेलेल्या पुस्कांमधून ऐक आहे. हे पुस्तक रॉबर्ट टी. कियोसाकी यानी लिहले आहे. याच्यामध्ये त्यांनी श्रीमंत कस होव आणि त्या साठी कसा विचार करावा तसेच संधींच सोनं कस करावे हे सांगितले आहे. 
          पैसे बनवायला पैश्यांची गरज नसते तर यासाठी शब्दांची गरज असते असे ते सांगतात. श्रीमंत व्यक्ती आणि गरीब व्यक्ती यांच्यात याच शब्दांचा फरक असतो. यासाठी श्रीमंत होण्यासाठी आपल्याला आपल्या शब्दावली वाढवायला हवी असे ते सांगतात. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की हे सर्व शब्द मोफत आहेत. त्यांच्या मते शब्दांचा अर्थ न समजल्याने जेवढं नुकसान होत नाही त्यावरूनही जास्त नुकसान या शब्दाचा चुकीचा अर्थ काढल्याने होतो. आणि यामुळे त्या व्यक्तीचे आर्थिक नुकसान खूप होते. याच्यामुळेच काही व्यक्ती आपल्या जबाबदारीलाच संपत्ती म्हणतो जबाबदारी आणि संपत्ती त्याच्यात खूप मोठा फरक आहे. 
 तुमचे घर हे तुमची जबाबदारी आहे ही तुमची संपत्ती नाही. ज्याच्या मधून तुम्हाला रिटर्न मिळत नाही परंतु तुम्हाला त्याच्यावर खर्च करावा लागतो ती गोष्ट तुमची जबाबदारी असते. घरावर तुम्हाला मेंटेनन्स साठी खूप खर्च करावा लागतो त्याच्यामुळे घर ही तुमची जबाबदारी आहे नाही की संपत्ती. परंतु तुम्ही जर तुमचे घर भाडेतत्त्वावर दिलेली असेल तर ते घर तुमची संपत्ती असते.तुमच्याकडे एक चांगली योजना आहे आणि तुम्ही त्याच्यावर योग्य पद्धतीने कार्य केलं तर तुम्ही स्वतःहूनच श्रीमंत बनता. 
नवीन पुस्तकात वॉरेन बफे यांचे एक वक्तव्य सुद्धा जोडले आहे ते असं "मी टीव्ही वर येणाऱ्या ज्ञानी लोकांना नाही बघत. " 
          तुम्ही स्वतः साठी म्हणजे स्वतः चा बिजनेस करत असाल किंवा दुसऱ्या साठी काम जर तुम्हाला श्रीमंत होयच असेल तर तुम्हाला स्वतः च्या धांदयच लक्ष स्वतः लाच ठेवावं लागेल. तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. 
त्यांनी तीन गोष्टी दिल्या आहेत त्यातील तुम्ही कोणती निवडताल 
1.सुरक्षित 
2.आरामदायक 
3.श्रीमंत (rich)
ते सांगतात की त्यांचा क्रम हा 
1.श्रीमंत 
2.आरामदायक 
3.सुरक्षित 
असा असेल परंतु तरी पण सुरक्षित आणि आरामदायक स्तरांची योजना तुम्हाला श्रीमंत होण्या अगोदर बनवावी लागेल. 
या नंतर त्यांनी आय (income) 3 प्रकार चे असतात असे सांगितले आहे. 
    1. सामान्य :-यात पगार किंवा कामाच्या बदल्यात मिळणारी सामान्य प्रकारची आय असते
    2. पोर्टफोलिओ :- यात शेअर, बोंड किंवा मुचुअल फंड द्वारा प्राप्त केली जाते.
   3. निष्क्रिय :- यात अचल संपत्ती जसे प्रॉपर्टी, जमीन जयदात. 
         लेखक सांगतात की तुम्ही सामान्य पद्धतीने मिळवलेली संपत्ती प्रयत्न करून पोर्टफोलिओ किंवा निष्क्रिय पद्धतीच्या आय मध्ये बदला.तसेच आपल्या सामान्य पद्धतीने मिळवलेल्या पैसे ला सुरक्षित ठेवायचं आहे. याच्यासाठी तुम्ही अशी काही सिक्युरिटी विकत घ्या. (नोट:- सिक्युरिटी ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला अशी आशा असते की ती तुमचे पैसे सुरक्षित ठेवेल गॅरंटी नाही.)
          याच्यासाठी लेखक काही पायाभूत नियम सांगत आहेत ते पुढील प्रमाणे
1. कधीच पैशासाठी काम नका करू.
2. नोकरी नाही तर संधीच्या शोधात रहावा.
3. फायनान्शिअल स्टेटमेंट वाचायला शिका.
 फायनान्शिअल स्टेटमेंट म्हणजे तुमच्याकडे येणारे पैसे आणि जाणारे पैसे यांचा योग्य पद्धतीने ठेवलेला हिशोब. अनेक वेळा लोक तुम्हाला म्हणतात की तुम्ही असं करू शकत नाही कारण ती गोष्ट ते लोक करू शकत नाहीत. लोक म्हणतात की तुम्ही या मधून पैसे मिळू शकत नाही कारण ते लोक त्या कामांमधून पैसे मिळू शकत नाहीत. लोक असं म्हणतात कारण ते लोकांना समजत नसतं. त्याच्यात त्यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन एक उदाहरण दिलेलं आहे ते असं की अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणत होते की महान लोकांना नेहमीच सामान्य लोकांकडून जबरदस्त विरोध झालेला आहे. 
          लेखकांनी पाच अशा विषयी सांगितले आहेत की त्यांच्यापासून नेहमीच लोकांना दूर राहिलं पाहिजे.
1.डर /भीती 
2.सनकीपण 
3.आळस 
4.वाईट सवयी 
5.जिद्द 
 या उपरयुक्त अशा काही गोष्टी आहेत की ज्या माणसांना श्रीमंत होण्यापासून लांब ठेवतात.
 फायनान्शियल जिनियस:- 
1. मला वास्तव पेक्षा मोठं कारण पाहिजे
2. मी प्रत्येक दिवशी पर्याय निवडत असतो
3. पहिल्यांदा मी शिक्षणात इन्व्हेस्ट (निवेश )करत असतो
4. आपल्या मित्रांना सावधतेने निवडत असतो
5. एखाद्या फॉर्मुले चा विशेषज्ञ बनत असतो आणि नंतर नवीन फार्मूला शोधत असतो
6. स्वतःला सर्वात आधी पैसे देत असतो
 वरील गोष्टी वाचताना तुम्हाला थोडा प्रॉब्लेम झाला असेल पण त्या मी तुम्हाला नीट सविस्तर सांगतो. लेखक म्हणतात की मला कोणतेही काम करण्यासाठी वास्तव पेक्षाही मोठं कारण पाहिजे जेणेकरून त्या कामात मला रुची वाढेल. मी रोज रोज नवीन पर्याय शोधत असतो ज्यांनी मला नवीन नवीन गोष्टी मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला आणि त्याने मला होणारा फायदा समजून घ्यायला मदत मिळते. सर्वात आधी मी कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी आधी माझा वेळ मी त्याला देत असतो मी माझ्या मित्रांना नेहमीच सावधतेने निवडत असतो. कारण दोस्तांचा परिणाम आपल्या सवयीवर होत असतो. पहिल्यांदा मी कोणत्यातरी फॉर्मुले चा एक्सपोर्ट बनतो त्याच्यामुळे मला त्यातील सर्व बारीक गोष्टी समजून येतात उदाहरणार्थ समजा मी मोबाईलच्या धंद्या विषयी माहिती मिळवत असेल तर मी त्यातील सर्व माहिती आधी घेतो आणि याच्यामध्ये मला सर्व मिळाल्यानंतर मी नवीन एखाद्या धंद्यातील बारीक बारीक गोष्टी शिकण्यात अजून थोडा जास्त वेळ देतो.आणि नेहमी मी सर्वात प्रथम स्वतःला वेळ देत असतो म्हणजेच मला स्वतःला काही पाहिजे आहे नाही त्याचा विचार करत असतो
          रॉबर्ट कियास्की यांच्या मते आपण सर्वात जास्त वेळ हा शिकण्यासाठी कॉलेज शाळा यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. परंतु त्या ठिकाणी आपल्याला पैश्या विषयी माहिती काहीच दिली जात नाही याने  आपण पैशासाठी काम करायला शिकतो पैसे मिळवण्यासाठी नोकरीही करतो परंतु पैसा त्यांच्यासाठी कसा काम करेल हे त्यांना शिकवलं जात नाही यामुळे मोठ्यापणी जास्त लोक हे पैशासाठी काम करतात आणि खूपच कमी लोक पैशाच्या कडून आपले काम करून घेतात. रिच डॅड अँड पुअर डॅड या पुस्तकाचा मी सारांश सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आवडला असेल तर कमेंट नक्की करा आणि नसेल आवडलं तर ही कमेंट करून कोणत्या चुका पुन्हा करू नये याचे मार्गदर्शन करा

                                  !धन्यवाद !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाळवी

Babasaheb Ambedkar on Savarkar

आयुर्वेद -विनाशातून विनाशाकडे की आयुषकडे!